आर्द्रता घटली, आठवडाभरात वाढणार उष्णतामान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 12:23 AM2021-03-07T00:23:48+5:302021-03-07T00:25:36+5:30

Humidity decreased विदर्भातील वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण कोरडे होण्याची शक्यता आहे.

Humidity decreased, temperature increased throughout the week | आर्द्रता घटली, आठवडाभरात वाढणार उष्णतामान

आर्द्रता घटली, आठवडाभरात वाढणार उष्णतामान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भातील वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण कोरडे होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील सरासरी तापमान ३८ ते ३८.८ अंशाच्या जवळपास जाईल, असा अंदाज वर्तविला आहे.

नागपूर शहरातील शनिवारचे तापमान ३७.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसभर वातावरणात चांगलाच उकाडा होता. शहरातील आर्द्रतेमध्येही मोठ्या प्रमाणावर घट नोंदविण्यात आली. सकाळी आर्द्रता ३७ टक्के होती. ती सायंकाळी घटून १७ टक्क्यांवर आली. त्यामुळे सायंकाळी वातावरणात उकाडा जाणवत होता.

विदर्भात चंद्रपूर आणि अकोल्यात सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. चंद्रपुरात ३९.४ तर अकोल्यात ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती, बुलडाणा, गडचिरोली, यवतमाळ आणि नागपूरचे तापमान ३७ अंशावर राहिले. तर वर्ध्यात मध्ये ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

नागपुरातील भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, ६ मार्च ते १० मार्च दरम्यान आकाश निरभ्र राहील, असा अंदाज आहे. हवामान कोरडे, कमाल तापमान ३८ ते ३८.८ अंश सेल्सिअस, किमान तापमान १७.५ ते १९.५ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ४७ टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २९ टक्के तर वाऱ्याचा वेग ६ किलोमीटर प्रती तास राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

तापमानात होणारी संभाव्य वाढ लक्षात घेता, जनावरांना हिरवा चारा, पिण्यास थंड व स्वच्छ पाणी द्यावे तसेच सावलीच्या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पालेभाज्या, भेंडी, गवार, चवळी, काकडी, दुधी भोपळा, काशीफळ, दोडका, कारली, ढेमसे, टरबूज, खरबूज, पालक, मुळा, मेथी आणि कोथिंबीर पिकास जमिनीतील ओलावा बघून आवश्यकतेनुसार ओलीत करावे. परिपक्व झालेल्या हरभरा, जवस, गहू, ज्वारी, मका, करडई, तूर आणि इतर पिकाची तात्काळ काढणी व मळणीची कामे करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असेही सुचविण्यात आलीे आहे.

Web Title: Humidity decreased, temperature increased throughout the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.