Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
नोटा हे वैध मत असले तरी अनामत रकमेसाठी ही मते वगळता फक्त वैध मतांचा हिशेब केला जातो. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत धामणगाव रेल्वे मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी ३३,०८६ मते मिळविणे आवश्यकता होती यामध्ये वीरेंद्र ज ...
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने क्षेत्र अधिकाऱ्यांची कार्यशाळा नियोजन भवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर आदी यावेळी उपस्थित होते. ...
ना. बावनकुळे पुढे म्हणाले, गेली २५ वर्षे सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडत आहेत. ते विधानसभेतील सर्वोत्तम आमदार म्हणून गौरविले गेले आहे. राज्यातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा गौरव झाल ...
विधानसभा निवडणुकीत यंदा थेट मतदारांच्या गाठीभेटींना उमेदवारांकडून प्राधान्य दिले जाणार आहे. तसे नियोजन आखले जात आहे. मात्र, जनतेचा बदलता मूड लक्षात घेता, बहुतांश उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. सोशल मीडियावर तशा प्रकारचे ग्रु ...
आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक शाखेने पथक नियुक्त केली आहे. भरारी पथक १६, स्थीर सर्व्हेंक्षण पथक १६, व्हिडीओ चित्रीकरण पथक १६, व्हीडीओ चित्रिकरण पाहणी पथक ५ व खर्चनियंत्रण पथक ५ अशी एकूण ५८ पथक नियुक्त कर ...