११४ उमेदवारांनी गमावली अनामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:01:04+5:30

नोटा हे वैध मत असले तरी अनामत रकमेसाठी ही मते वगळता फक्त वैध मतांचा हिशेब केला जातो. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत धामणगाव रेल्वे मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी ३३,०८६ मते मिळविणे आवश्यकता होती यामध्ये वीरेंद्र जगताप यांच्यासह भाजपाचे अरुण अडसड यांनाच अपेक्षित मतांचा कोटा पूर्ण करता आला.

. Candidates lose deposit | ११४ उमेदवारांनी गमावली अनामत

११४ उमेदवारांनी गमावली अनामत

Next
ठळक मुद्देविधानसभा २०१४ ची स्थिती : आठ मतदारसंघांमध्ये १३५ उमेदवार

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये १३५ उमेदवार रिंगणात होते. यापैकी फक्त २१ उमेदवारांचे डिपॉझिट वाचले. उर्वरित ११४ म्हणजेच ८५ टक्के उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली नाही. यामध्ये राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे.
नोटा हे वैध मत असले तरी अनामत रकमेसाठी ही मते वगळता फक्त वैध मतांचा हिशेब केला जातो. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत धामणगाव रेल्वे मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी ३३,०८६ मते मिळविणे आवश्यकता होती यामध्ये वीरेंद्र जगताप यांच्यासह भाजपाचे अरुण अडसड यांनाच अपेक्षित मतांचा कोटा पूर्ण करता आला. या ठिकाणी १७ उमेदवारांना अनामत रक्कम गमावावी लागली.
बडनेरा मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी आवश्यक २९,६४६ मतांचा कोटा फक्त रवि राणा, शिवसेनेचे संजय बंड, भाजपचे तुषार भारतीय, काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनाच पूर्ण करता आला. या मतदारसंघात ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. अमरावती मतदारसंघात २० उमेदवार रिंगणात होते. यामध्ये अनामत रक्कम वाचविण्यासाठी २६,७११ मतांचा कोटा फक्त भाजपाचे सुनील देशमुख व काँग्रेसचे रावसाहेब शेखावत पूर्ण करू शकले. या ठिकाणी १८ उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली नाही.
मोर्शी मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघात अनामत रक्कम वाचविण्यासाठी ३०,६४४ मतांची आवश्यकता होती. मात्र, भाजपचे अनिल बोंडे व राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख यांचे डिपॉझिट वाचले. उर्वरित १७ उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली. मेळघाट मतदारसंघात एकूण सहा उमेदवार रिंगणात होते. यापैकी भाजपचे प्रभुदास भिलावेकर, काँग्रेसचे केवलराम काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार पटेल हेच आवश्यक २८,६८८ मतांचा कोटा पूर्ण करू शकले. अन्य तीन उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
अचलपूर मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात होते. यापैकी बच्चू कडू व भाजपचे अशोक बनसोड आवश्यक २९,८१९ मतांचा कोटा पूर्ण करू शकले. उर्वरित १७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. तिवसा मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, भाजपच्या निवेदिता चौधरी (दिघडे) व शिवसेनेचे दिनेश वानखडे हे उमेदवार अनामत रक्कम वाचविण्यासाठी आवश्यक २८,१७४ मतांचा कोटा पूर्ण करु शकले. उर्वरित १५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. दर्यापूर मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात होते. यापैकी भाजपचे रमेश बुंदिले, शिवसेनेचे अभिजित अडसुळ व रिपाइंचे बळवंत वानखडे आवश्यक ३०,३२५ मतांचा कोटा पूर्ण करू शकले. उर्वरित उमेदवारांची अनामत शासनजमा झाली.

अनामत रकमेसाठी असे आहे गुणोत्तर
राजकारणात स्पर्धक किंवा विरोधकाचा उल्लेख करताना अनेकदा ‘डिपॉझिटही वाचले नाही’ असा उपहासाने उल्लेख केला जातो. अनामत रक्कम जप्त झाली म्हणजे नेमके काय झाले, असा प्रश्न कुतूहलाने विचारला जातो. एकूण वैध मतांच्या १/६ मते न मिळाल्यास त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त केली जाते. यामध्ये नोटाला मिळालेली मते गृहीत धरले जात नाहीत.

१०.४५ लाख रक्कम शासनाकडे जमा
विधानसभेसाठी सर्वसाधारण मतदारसंघात १० हजार व राखीव मतदारसंघासाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम असते. २०१४ च्या निवडणुकीत ११४ उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली नाही. राखीव असलेल्या मेळघाट व दर्यापूरमध्ये १९ उमेदवारांचे ९५ हजार व अन्य सहा मतदारसंघांत ९५ उमेदवारांचे ९.५० लाख अशी एकूण १०.४५ लाख रुपयांची अनामत रक्कम शासनजमा झाली.

Web Title: . Candidates lose deposit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.