Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आरेमधील वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली होती. ...
नाशिक : मनसे स्थापन झाल्यानंतर नाशिकची ‘दोन हाती’ सूत्रे वसंत गिते आणि अतुल चांडक यांच्याकडे एकवटली होती. त्यावेळी त्यांच्या विषयीच्या बऱ्या वाईट तक्रारींची दखल घेऊन राज ठाकरे यांनी अॅड. राहुल ढिकले यांच्याकडे सूत्रे दिली आणि सर्वाधिकार त्यांनाच देऊ ...
नाशिक : मनसेने नाशिक जिल्ह्यात पंधराच्या पंधरा विधानसभा जागा लढविण्याची तयारी केली, त्यासाठी पक्षाकडे उमेदवार नसले तरी अन्य पक्षांतून येणाऱ्यांना संधी देण्याची तयारीदेखील केली; परंतु त्यानंतरदेखील पक्षाला अपेक्षित उमेदवार देता आले नाही. संपूर्ण जिल्ह ...
उमेदवारी अर्जांच्या शनिवारी झालेल्या छाननीमध्ये नागपूर पश्चिम मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सोनू प्रभाकर चहांदे यांचा अर्ज अवैध ठरला. यावर पक्षाने आक्षेप घेतला असून अधिकाऱ्याच्या चुकीमुळेच अर्ज रद्द झाल्याचा आरोप केला आहे. ...
नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात एकूण २०५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यापैकी छाननीमध्ये एकूण २८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. ...
सोशल मीडियाचा वापर दुधारी शस्त्रासारखा असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांच्या प्रचाराचा रोजचा अहवाल तयार केला जात आहे. यासाठी सायबर सेलची यंत्रणा कामी लागली असून हा अहवाल दरररोज सायंकाळी निवडणूक आयोगाकडे जात आहे. ...