Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचाराचा रोज तयार होतो अहवाल : एक गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 07:49 PM2019-10-05T19:49:32+5:302019-10-05T19:56:57+5:30

सोशल मीडियाचा वापर दुधारी शस्त्रासारखा असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांच्या प्रचाराचा रोजचा अहवाल तयार केला जात आहे. यासाठी सायबर सेलची यंत्रणा कामी लागली असून हा अहवाल दरररोज सायंकाळी निवडणूक आयोगाकडे जात आहे.

Maharashtra Assembly Election 2019: Social media election campaign report made daily | Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचाराचा रोज तयार होतो अहवाल : एक गुन्हा दाखल

Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचाराचा रोज तयार होतो अहवाल : एक गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देउमेदवारांच्या प्रचारावर सायबर सेलची नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीच्या प्रचारासाठी आजवर वापरण्यात आलेल्या पारंपारिक साधनांमध्ये आता सोशल मीडियाचीही भर पडली आहे. या माध्यमाचा वापर दुधारी शस्त्रासारखा असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांच्या प्रचाराचा रोजचा अहवाल तयार केला जात आहे. यासाठी सायबर सेलची यंत्रणा कामी लागली असून हा अहवाल दरररोज सायंकाळी निवडणूक आयोगाकडे जात आहे.
निवडणूक काळातील सायबर गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी क्रिस्टो फॉरेन्सिक एजंसीची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून सायबर सेलच्या चमुने या निवडणुकीत तीन दिवसांपूर्वी सदर पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरू केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आठ गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सायबर सेलची ही चमू राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियावर नजर ठेऊन राहणार आहे. वापरलेले इमोजी, फॉरवर्ड आणि शेअर होणाऱ्या पोस्ट, त्याला मिळणारे लाईक्स, प्रक्षोभक प्रतिक्रिया याची नोंद प्रत्यक्ष उमेदवाराच्या नावानुसार घेतली जात आहे. सायबर सेलच्या माध्यमातून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचीही तरतुद आहे. एवढेच नाही तर प्रचार होत असल्यास संबंधित उमेदवाराच्या अकांउंटमधून पैसे कपात केले जाणार आहेत.
नोडल ऑफिसर आणि तीन कमेट्या
या कामावर लक्ष ठेवण्यासाठी नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या अंतर्गत तीन कमेट्या तयार करण्यात आल्या आहे. यात सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्यासाठी तीन कमेट्या तयार करण्यात आल्या असून रोज मॉनिटरिंग सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसार माध्यमाच्या कक्षात पाच दूरदर्शन संच लावण्यात आले असून त्याचेही रोज मॉनिटरिंग सुरू असते. सोशल मीडियावरील नियंत्रणासाठी सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक (ग्रामीण) मोनिका राऊत आणि पत्रकार प्रतिनिधी म्हणून मोहित हक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
४२ अ‍ॅप्स धोकादायक घोषित
निवडणूक आयोगाने ४२ अ‍ॅप्स धोकादायक घोषित केले आहेत. यात वेबो, वुइचाट, शेअरइट, ट्रयुकॉलर, युसी न्यूज, युसी ब्रॉडकास्ट, ब्युटीप्लस, न्यूजडॉग आदींसह ४२ अ‍ॅप्सचा यात समावेश आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी निर्बंध नसले तरी निवडणूक कर्तव्यावरील अधिकाऱ्यांना मात्र माहितीच्या आदाप्रदनासाठी या अ‍ॅप्सच्या वापरावर निवडणूक काळासाठी मनाई करण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Social media election campaign report made daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.