मनसेला जिल्ह्यात मिळाले अवघे सात उमेदवार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 10:39 PM2019-10-05T22:39:34+5:302019-10-05T22:40:02+5:30

नाशिक : मनसेने नाशिक जिल्ह्यात पंधराच्या पंधरा विधानसभा जागा लढविण्याची तयारी केली, त्यासाठी पक्षाकडे उमेदवार नसले तरी अन्य पक्षांतून येणाऱ्यांना संधी देण्याची तयारीदेखील केली; परंतु त्यानंतरदेखील पक्षाला अपेक्षित उमेदवार देता आले नाही. संपूर्ण जिल्ह्यात एकूण सात उमेदवार देण्यात पक्षाला यश आले असून, त्यात अवघे तीन पक्षांतील मूळ कार्यकर्ते असून, तर चार अन्य पक्षांतून आलेले आयाराम आहेत.

MNS gets seven candidates in district! | मनसेला जिल्ह्यात मिळाले अवघे सात उमेदवार !

मनसेला जिल्ह्यात मिळाले अवघे सात उमेदवार !

Next
ठळक मुद्देआयारामांचीही वानवा । भुजबळांच्या विरोधातील उमेदवाराचा अर्ज बाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मनसेने नाशिक जिल्ह्यात पंधराच्या पंधरा विधानसभा जागा लढविण्याची तयारी केली, त्यासाठी पक्षाकडे उमेदवार नसले तरी अन्य पक्षांतून येणाऱ्यांना संधी देण्याची तयारीदेखील केली; परंतु त्यानंतरदेखील पक्षाला अपेक्षित उमेदवार देता आले नाही. संपूर्ण जिल्ह्यात एकूण सात उमेदवार देण्यात पक्षाला यश आले असून, त्यात अवघे तीन पक्षांतील मूळ कार्यकर्ते असून, तर चार अन्य पक्षांतून आलेले आयाराम आहेत.
२००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातील चार पैकी तीन मतदारसंघात उमेदवार निवडून आले होते तसेच महापालिकेत २०१२ मध्ये सत्तादेखील आली होती. त्यामुळेच नाशिक हा राज ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला गेला; परंतु नंतर मात्र पक्षाचा प्रभाव कमी होत गेला. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा एकही उमेदवार नाशिक शहरातून निवडून आला नाही, तर महापालिकेच्या निवडणुकीतदेखील पक्षाची पीछेहाट झाली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर निवडणुकीसाठी निवडणूक लढवावी किंवा नाही अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या राज यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला; मात्र नाशिक-पुणे-मुंबई या सुवर्ण त्रिकोणातच शंभर जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर नाशिकमध्ये मनसेचे नेते अभिजित पानसे आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुलाखती घेतल्या. त्यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यात पंधरा जागांवर उमेदवार देणार असल्याचे सांगितले. त्यासाठी ऐनवेळी अन्य पक्षांतून येणाऱ्यांनादेखील संधी देऊ असे उघडपणे सांगितले.
तथापि, पक्षाला पंधरापैकी सात मतदारसंघातच उमेदवार मिळाले आहेत. यात नाशिक शहरात चारपैकी नाशिक पूर्व व नाशिक मध्यमध्ये दोन मतदारसंघात मूळ पक्षाचे उमेदवार आहेत, तर उर्वरित उमेदवारांपैकी नाशिक पश्चिम आणि देवळालीत शिवसेना आणि कॉँग्रेसमधून आलेल्यांना संधी देण्यात आली आहे.
इगतपुरीतदेखील दोन वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या आणि सध्या नगरसेवक असलेल्या युवकाला संधी देण्यात आली आहे, तर दिंडोरीत माजी सनदी अधिकारी आणि मालेगाव बाह्यमध्येदेखील आयारामांना संधी देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधात लढण्यासाठी येवल्यात ज्या उमेदवाराला संधी मिळाली त्याचा अर्जच छाननीत बाद झाला आहे. येवल्यात राज-भुजबळ मनोमिलन ?कुटुंबीयातील पहिला ठाकरे वरळी मतदारसंघात नशीब आजमावयाला निघाल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वरळीतून उमेदवार न देता अप्रत्यक्षपणे पुतण्याला साथ देण्याचे ठरविले. त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील मनसेच्या उमेदवाराला एबी फॉर्मच न मिळाल्याने त्याचा अर्ज बाद ठरविण्यात आल्यामुळे राज हे अप्रत्यक्षपणे भुजबळांच्या पाठीशी उभे राहिल्याची चर्चा रंगली आहे. मनसेचे येवल्यातून इच्छुक असलेल्या उमेदवाराने एबी फॉर्मच जोडला नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे भुजबळ आणि राज ठाकरे यांचे या मतदारसंघापुरते ‘मनोमिलन’ झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

Web Title: MNS gets seven candidates in district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.