याचसाठी केला होता अट्टाहास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 10:47 PM2019-10-05T22:47:37+5:302019-10-05T22:48:21+5:30

नाशिक : मनसे स्थापन झाल्यानंतर नाशिकची ‘दोन हाती’ सूत्रे वसंत गिते आणि अतुल चांडक यांच्याकडे एकवटली होती. त्यावेळी त्यांच्या विषयीच्या बऱ्या वाईट तक्रारींची दखल घेऊन राज ठाकरे यांनी अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्याकडे सूत्रे दिली आणि सर्वाधिकार त्यांनाच देऊन टाकले. त्यामुळे गिते-चांडक पक्ष सोडून गेले आणि आता त्याच ढिकले यांनी राज यांची साथ सोडल्याने ‘याचसाठी केला होता अट्टाहास’, असे म्हणण्याची वेळ राज यांच्यावर आली आहे.

This is why Attahas ... | याचसाठी केला होता अट्टाहास...

याचसाठी केला होता अट्टाहास...

googlenewsNext
ठळक मुद्देढिकलेंची सोडचिठ्ठी । सूत्रे आता कोणाकडे?

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मनसे स्थापन झाल्यानंतर नाशिकची ‘दोन हाती’ सूत्रे वसंत गिते आणि अतुल चांडक यांच्याकडे एकवटली होती. त्यावेळी त्यांच्या विषयीच्या बऱ्या वाईट तक्रारींची दखल घेऊन राज ठाकरे यांनी अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्याकडे सूत्रे दिली आणि सर्वाधिकार त्यांनाच देऊन टाकले. त्यामुळे गिते-चांडक पक्ष सोडून गेले आणि आता त्याच ढिकले यांनी राज यांची साथ सोडल्याने ‘याचसाठी केला होता अट्टाहास’, असे म्हणण्याची वेळ राज यांच्यावर आली आहे.
मनसे स्थापन झाल्यानंतर २००९ मध्ये नाशिक शहरातील चारपैकी तीन जागा मनसेला मिळाल्या. नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच चाळीस जागांचा टप्पा मनसेने पार केला; परंतु सत्ता येत असताना सर्व सूत्रे वसंत गिते आणि अतुल चांडक यांच्या हाती एकवटली होती. पण तेथूनच कुरबुरींना सुरुवात झाली. राज यांच्याकडे गिते-चांडक या जोडगोळी विषयी तक्रारींचा पाढा सुरू झाला. राज यांनी त्या तक्रारींवर विश्वास ठेवला आणि जोडगोळीचे पंख छाटले. त्यामुळे गिते यांनी पक्ष सोडला ते भाजपात गेले. त्यानंतर अतुल चांडक हे मुळातच राजकारणी नव्हते. त्यांनी त्यांच्या व्यवसायाकडे लक्ष दिले. त्यानंतर शहराध्यक्ष राहुल ढिकले यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली. मनसेची आज अवस्था बिकट आहे. त्यातच राज यांची निवडणूक लढवावी किंवा नाही अशी द्विधा मन:स्थिती असल्याचे निमित्त करून ढिकले यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे आता पक्षाची सूत्रे कोणाकडे सोपवायची असादेखील प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक नेत्यांना राहुल भेटल्याने राज नाराजमनसेची सर्व सूत्रे त्यातच प्रदेशपातळीवरील पद असे सर्व काही दिले असतानाही राहुल ढिकले हे विधानसभेसाठी अगतिक झाले होते. त्यांनी राष्टÑवादीचे नेते शरद पवार, भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भेटी-गाठी घेतल्या, असे सांगितले जाते. त्यामुळे राज ठाकरे नाराज झाले.

Web Title: This is why Attahas ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.