माडसांगवी व परिसरातील वाढत्या दारूधंद्याच्या त्रासाला कंटाळून स्थानिक महिलांनी हातात दंडुके घेऊन गावातील ग्रामपंचायतसमोर ठिय्या आंदोलन केले व आपली व्यथा गावातील पदाधिकारी व पोलिसांसमोर व्यक्त केली. ...
तालुक्यातील पंदेवाही येथील गाव संघटनेच्या महिलांनी देशी दारूची विक्री करणाऱ्याच्या घरी धाड टाकून दारू विक्रेत्याला मुद्देमालासह पकडले. संजय दंडिकवार असे आरोपीचे नाव आहे. मुद्देमालासह त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...
सुर्याटोला परिसरातील रावजीभाई समाजवाडीच्या मैदानात जमलेल्या मैफलीवर धाड घालून रामनगर पोलिसांनी ११ जणांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने ‘सुर्याटोला मैदान बनला दारू ड्यांचा अड्डा’ या मथळ््याखाली बातमी प्रकाशित केली होती. ...
भंडारा शहरातील सामाजिक स्तरात बदल होत असतानाच सुरक्षितताही हरवत चालल्याची भावना दिसून येत आहे. शहरातील काही भागात चोरी छुपे दारुची विक्री होत असल्याने सायंकाळी ६ वाजतानंतर काही चौकांमध्ये तर मद्यपींची जत्राच भरली आहे, असे जाणवते. ...
तब्बल आठ महिने दारूविक्री बंद असलेल्या सूर्यडोंगरी गावात विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची माहिती मिळताच किटाळी येथील गाव संघटनेच्या महिलांनी गावात दाखल होत विक्रेत्यांना सज्जड दम दिला. दारूविक्री पुन्हा सुरू केल्यास पोलीस तक्रार करणार असल्याचा ...
सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे मुंबई - गोवा महामार्गावरील बांदा कट्टा येथे गोवा बनावटीची अनधिकृत दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. ...
देसाईगंज पोलिसांनी शुक्रवारी दोन ठिकाणी सापळा रचून सुमारे ३ लाख ६ हजार रुपयांची दारू व दोन वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे. चार जणांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुनी येथून मारोती सुझूकी या चारचाकी वाहनाने देसाईगंजात दारू आणली जात असल्या ...