Late to bring alcohol, wife murdered, husband arrested | दारू आणायला उशीर केल्याने पत्नीची हत्या, पतीला अटक
दारू आणायला उशीर केल्याने पत्नीची हत्या, पतीला अटक

मुंब्रा : दारू आणण्यासाठी गेलेली पत्नी दारू घेऊन उशिरा आल्याने मारहाण करून तिची हत्या केल्याप्रकरणी पती प्रविण पुरबिया याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.

शिवाजीनगर भागातील शिवविलास पॅलेस या इमारतीत पुरबिया कुटुंबीय राहते. प्रविण याने गुरु वारी दुपारी कामावरून आल्यानंतर त्याची पत्नी संतोषी हिला दारू आणण्यासाठी पाठवले. मात्र, दारू घेऊन ती उशिरा परत आल्याने त्याने तिच्याशी वाद घातला. तसेच तिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना सात वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांच्या मुलासमोर घडली. औषध प्यायल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची तक्रार प्रविणने स्वत: पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, तपासात त्यानेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर अधिक तपास करत आहेत.

 


Web Title: Late to bring alcohol, wife murdered, husband arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.