Sale of theft theft | चोरी चोरी दारुची विक्री..
चोरी चोरी दारुची विक्री..

ठळक मुद्देसायंकाळ ६ नंतर भरते मद्यपींची जत्रा

पोलिसांची भूमिका दावणीला।
महिला व तरुणींना उद्भवतो त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा शहरातील सामाजिक स्तरात बदल होत असतानाच सुरक्षितताही हरवत चालल्याची भावना दिसून येत आहे. शहरातील काही भागात चोरी छुपे दारुची विक्री होत असल्याने सायंकाळी ६ वाजतानंतर काही चौकांमध्ये तर मद्यपींची जत्राच भरली आहे, असे जाणवते.
दारुची विक्री हा काही नवीन भाग नाही. मात्र ती विक्री परवानाधारक दुकानातून होणे महत्वाचे आहे. मात्र भंडारा शहरातील मोठा बाजार परिसर, खात रोड, शुक्रवारी परिसर, मेंढा परिसर, चांदणी चौक ते जगनाडे चौकापर्यंतचा परिसर या भागात दारुची खुलेआम तर कुठे चोरीछुपे विक्री होत आहे. अल्पोहार किंवा नाश्त्याच्या दुकानातून ही विक्री होत असते. आधीच भंडारा शहरातील विशेषत: चौकांमधील रस्ते अरुंद आहेत. त्यातही खुलेआम दारु विक्रीने मद्यपींचा रस्त्यावरच ठिय्या दिसून येतो. परिणामत: सायंकाळी ६ वाजतानंतर सदर भागातून महिला व युवती रहदारी करायला मागे पुढे पाहत आहेत. याबाबत पोलिसांच्या खबऱ्यांनाही याची चांगलीच माहिती आहे. मात्र हिस्सेदारी मिळत असल्याने कारवाई करण्यास पोलीस प्रशासन धजावत नसल्याचेही चित्र दिसून येते.

राजीव गांधी चौक परिसरात तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाजवळच देशी दारु विक्रीचे परवानाधारक दुकान आहे. दुकानाला परवानगी आहे यात दुमत नाही. परंतु मद्यपींची गर्दीमुळे सामान्यजन विशेषत: महिला वर्गाला त्रास सहन करावा लागतो. याच परिसरात मोठ्या प्रमाणात ट्युशन क्लासेस असल्याने विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात रहदारी असते. पोलिसांनी यावर लक्ष देण्याची गरज आहे.


Web Title: Sale of theft theft
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.