Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 09:50 AM2024-05-07T09:50:36+5:302024-05-07T09:51:00+5:30

Gautami patil: स्टेज शो करुन प्रसिद्धी मिळवणारी गौतमी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे.

gautami-patil-will-be-seen-in-bigg-boss-marathi-fame-utkarsh-shindes-lavani-photo-viral | Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

गौतमी पाटील (gautami patil) हे नाव आज कोणासाठीही नवीन नाही. तिच्या अदांनी आणि नृत्याविष्काराने तिने उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची वरचेवर चर्चा रंगत असते. स्टेज शो करुन प्रसिद्धी मिळवणाऱ्या गौतमीने मराठी कलाविश्वातही एन्ट्री केली आहे. परंतु, सध्या गौतमी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे. गौतमी नुकतीच बिग बॉस मराठी फेम एका अभिनेता, गायकासोबत स्पॉट झाली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

सोशल मीडियावर सध्या गौतमीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ती बिग बॉस मराठी ३ फेम अभिनेता, गायक, संगीतकार उत्कर्ष शिंदे याच्यासोबत दिसून येत आहे. या दोघांना एकत्र स्पॉट केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, हे दोघं एका खास कारणासाठी एकत्र आले आहेत.

लवकरच गौतमी आणि उत्कर्ष यांच्यावर चित्रीत झालेलं नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या प्रोजेक्टची माहिती उत्कर्षने सोशल मीडियावर दिली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

गौतमी पाटील आणि शिंदेशाही एकत्र नव्या ढंगात ……”आहो शेठ लय दिसान झालीया भेट “ या मी संगीतबद्ध केलेल्या माझ्या लावणीच्या अभुतपूर्व यशानंतर, आता नव्याने घेऊन येतोय मी लिहलेली,मी संगीतबद्ध केलेली नवी लावणी “आलं बाई दाजी माझं”, असं कॅप्शन देत उत्कर्षने त्याच्या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे.

दरम्यान, “आलं बाई दाजी माझं” या लावणीत उत्कर्ष आणि गौतमी स्क्रीन शेअर करणार आहेत. यापूर्वीही या जोडीने एका गाण्यात एकत्र काम केलं आहे. त्यामुळे त्यांचं नव्या गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: gautami-patil-will-be-seen-in-bigg-boss-marathi-fame-utkarsh-shindes-lavani-photo-viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.