कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
katrina kaif : कतरिना कैफ सध्या ‘फोन भूत’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमात कॅट भूताची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण सध्या कतरिनाबद्दल सोशल मीडियावर एक भलतीच चर्चा सुरू झालेली दिसतेय. ...
ICC Mens T20 World Cup 2022, Katrina Kaif : टीम इंडियाला चीअर करायला कतरिना स्टार स्पोर्ट्सच्या सेटवर पोहोचली. यावेळी कतरिना हरभजन सिंगच्या बॉलवर तुफान बॅटिंग करताना दिसली. ...