Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
तुमसर तालुक्यातील चिचोली येथील सरपंच अनिता नेवारे यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी पहिल्यांदा घरटॅक्स देणारे सामान्य नागरिक देवीचंद राठोड यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले. ...
देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली. पण एका आठ वर्षाच्या चिमुकलीला पोटाची खळगी भरण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आधार घ्यावा लागतो. कशासाठी? कचरा वेचून पोट भरण्यासाठी!एकीकडे देशाच्या स्वातंत्र्यांचा जल्लोष सुरु होता. ...
देशाच्या सीमांचे रक्षण करताना शत्रूच्या गोळ्या खायच्या आम्ही. बलिदानानंतर गावाकडे अंतिम संस्कार करताना चार बंदुकीच्या फैरी झाडल्या की झाला आमचा सन्मान. निवृत्तीनंतर साधा ध्वजारोहणाचा मानही आम्हाला मिळत नाही. हा प्रकार किती दिवस चालायचा, असा प्रश्न से ...
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या महापूरात लोक संकटात सापडली असताना महाराष्ट्रातील जनता जातीभेद, धर्मभेद विसरुन महापूरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी धावून आली. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला. ...
येथील आझाद मैदानातील ऐतिहासिक विजयस्तंभ घाणीच्या विळख्यात सापडला. या विषयीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच गुरुदेव युवा संघाने पुढाकार घेत विजयस्तंभाची स्वच्छता केली. या स्तंभाला सजविण्यात आले. तिरंगा ध्वज व खाऊ वाटप करण्यात आले. ...
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यावर आपला भर आहे. या योजनांचा जिल्ह्यातील नागरिकांना लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ...