Flagging at the hands of the first home tax payer in Chicholi | चिचोलीत प्रथम घरटॅक्स देणाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण

चिचोलीत प्रथम घरटॅक्स देणाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण

ठळक मुद्देग्रामपंचायतचा पुढाकार : सरपंच, उपसरपंचचाची सर्वत्र स्तुती

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : तुमसर तालुक्यातील चिचोली येथील सरपंच अनिता नेवारे यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी पहिल्यांदा घरटॅक्स देणारे सामान्य नागरिक देवीचंद राठोड यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले.
प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतचा धवजारोहण सरपंचाच्या हस्ते केला जातो. परंतु सरपंच अनिता नेवारे यांचे स्वप्न होते की जो प्रथम घरकर देणार त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्यात येईल आणि ते चिचोली चे सरपंच अनिता नेवारे व उपसरपंच कृष्णकुमार रहांगडाले यांनी करून दाखविले. सामान्य नागरिक देवीचंद राठोड यांनी सर्वप्रथम घरकर दिला होता. त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचा स्वतंत्र दिनी ध्वजारोहण करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. या अनोख्या कल्पनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून सर्वांनी सरपंचचाच्या कल्पनेची सर्वत्र स्तुती केली. धवजारोहण प्रसंगी सरपंच अनिता विनोद नेवारे, उपसरपंच कृष्णकुमार रहांगडाले, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ.हरेंद्र रहांगडाले, सदन चौधरी, द्वारकाप्रसाद रहांगडाले, के.डी.पारधी, ब्रिजलाल रहांगडाले, माणिक पारधी, विजय राणे, राजेश चंद्रिकापुरे, छाया रहांगडाले, दुर्गा चौधरी, स्वाती काळसारपे, कविता रहांगडाले, अनिता डोंगरे, विनोद नेवारे, मंजू चाचिरे, माटे गुरूजी, आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Flagging at the hands of the first home tax payer in Chicholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.