संकट काळात महाराष्ट्राने एकतेचे दर्शन घडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:03 AM2019-08-17T00:03:48+5:302019-08-17T00:04:56+5:30

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या महापूरात लोक संकटात सापडली असताना महाराष्ट्रातील जनता जातीभेद, धर्मभेद विसरुन महापूरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी धावून आली.

During the crisis, Maharashtra showed unity | संकट काळात महाराष्ट्राने एकतेचे दर्शन घडविले

संकट काळात महाराष्ट्राने एकतेचे दर्शन घडविले

Next
ठळक मुद्देसदाशिव खोत : स्वातंत्र्यदिनाचा वर्धापनदिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या महापूरात लोक संकटात सापडली असताना महाराष्ट्रातील जनता जातीभेद, धर्मभेद विसरुन महापूरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी धावून आली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सैन्य, नौदल आणि वायुसेनेच्या दलासोबतच सर्व जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरु आहे. संकटाच्या काळात महाराष्ट्राने एकतेचे दर्शन घडविले. असाच एकसंघपणा राज्याच्या विकासासाठी जनतेने दाखवावा, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याचा ७२ वा वर्धापनदिनाचा मुख्य शासकिय कार्यक्रम जिल्हा क्रिडा संकुल येथे पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, अतिरिक्त मुख्य कार्र्यकारी अधिकारी सत्यजित बढे, निवासी उपजिलहाधिकारी विजया बनकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी ना. खोत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त जनहित संस्थेचे अध्यक्ष सतीश बावसे व त्यांच्या चमूला तसेच प्रसन्न अविनाश बोधनकर यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत राष्ट्रीय, राज्यस्तरावर गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या विद्यार्थी अपूर्वा वनकर, शंतनू बारई व अमन खोडे, स्केटींग स्पर्धेत सुवर्ण पदक पटविलेले मैत्री ताकसांडे, तेजस बोरकर विद्यार्थ्यांचा व प्रशिक्षक विद्यापाल नाईक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जनहित मंचच्यावतीने पुरग्रस्तासाठी २१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ना. सदाशिव खोत यांच्याकडे सुर्पुद करण्यात आला.

Web Title: During the crisis, Maharashtra showed unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.