मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हॉटेल संघटनांसोबत रविवारी बैठक झाली होती. त्यानंतर, मंगळवारी काही नियमावलीनुसार ८ जुलैपासून हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. ...
या काळात हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाउस बंद असल्याने त्यांचा वापर कोरोनाच्या संशयित रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी केला जात आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात येत असल्याने लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. ...
निवास व्यवस्था असणारी हॉटेल जवळपास साडेतीन महिन्यानंतर बुधवार, ८ जुलैपासून सुरू होणार आहे. ग्राहकांची काळजी, नियमांचे पालन, सॅनिटायझेशन, मास्क, ग्लोव्हज आदींचा वापर करून आणि एकूण क्षमतेच्या ३३ टक्के उपयोग करूनच हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. ...
राज्य शासनाच्या निर्देशानुसार बुधवारपासून जिल्ह्यातील निवास व्यवस्था करणारी हॉटेल्स, लॉज व गेस्ट हाऊस ३३ टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत आदेश काढून अटी व शर्तींच्या नियमांचे पालन क ...
महाराष्ट्राच्या पर्यटनात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे ...