35% to 40% of restaurants close, fear of 'food' | ३५ ते ४० टक्के रेस्टॉरंट बंद होण्याच्या मार्गावर, ‘आहार’ची भीती

३५ ते ४० टक्के रेस्टॉरंट बंद होण्याच्या मार्गावर, ‘आहार’ची भीती

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. गेल्या सात महिन्यांपासून रेस्टॉरंट बंद आहेत. सरकारने लवकरात लवकर रेस्टॉरंट सुरू न केल्यास ३५ ते ४० टक्के रेस्टॉरंट कायमची बंद होतील, अशी भीती आहारने व्यक्त केली. राज्यातील मंत्री आणि विविध पक्षांचे नेते यांची भेट घेऊन लवकरात लवकर रेस्टॉरंट सुरू करावीत, अशी मागणी आहारच्या शिष्टमंडळाने केली आहे़
याबाबत आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, रेस्टॉरंटमुळे प्रत्यक्ष ६० लाख जणांना रोजगार मिळतो. तर अप्रत्यक्षपणे दोन कोटी लोकांना रोजगार मिळतो. कोरोना काळात रेस्टॉरंट क्षेत्राने कर्मचाऱ्यांना जेवण आणि राहण्याची व्यवस्था केली. सात महिन्यापासून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नाही, त्यामुळे व्यवसाय वाचविणे कठीण झाले आहे. पण परवाना मिळवण्यासाठी ८ लाख रुपये द्यावे लागतात. सरकारने तातडीने पावले उचलून या क्षेत्राला दिलासा द्यावा. अन्यथा ३५ ते ४० टक्के रेस्टॉरंट कायमस्वरूपी बंद होतील. तसेच वाढलेल्या भाड्यामुळे ६० रेस्टॉरंट बंद करावी लागतील. आता आम्ही कठीण काळातून जात आहोत.
या क्षेत्राला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत राज्य सरकारमधील मंत्री आणि राजकीय नेते यांची भेट घेतली. लवकरात लवकर रेस्टॉरंट सुरू करावीत अशी मागणी केली. राज्य सरकार तातडीने पावले उचलेल अशी अपेक्षा आहे.

- परवाना मिळवण्यासाठी ८ लाख रुपये द्यावे लागतात. सरकारने तातडीने पावले उचलून या क्षेत्राला दिलासा द्यावा. अन्यथा ३५ ते ४० टक्के रेस्टॉरंट कायमस्वरूपी बंद होतील.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 35% to 40% of restaurants close, fear of 'food'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.