येथील राष्ट्रीय महामार्ग सात वर येरला शिवारात वर्धा नदीच्या पुलाजवळ भरधाव कंटेनरने आॅटोला धडक दिली. यात आॅटोतील सहा जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास झाला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कन्हान हद्दीतील महामार्गाच्या विकास कामाला हिरवी झेंडी दाखवून रखडलेले संपूर्ण काम नऊ महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश दिला. ...
करंजा ते आरोंदा या ५५० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्ग दुपदरीकरणासाठी राज्य शासनाकडून २५०० कोटींचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. ...
महाल भागातील केळीबाग रोडच्या रुंदीकरणासाठी महापालिकेला १३७ कोटी ४१ लाखांची गरज आहे. यातील १२२ कोटी १४ लाख जमीन अधिग्रहण, जलवाहिनी व विद्युतवाहिनी दुसरीकडे स्थानांतरित करण्यावर खर्च होतील, तर बांधकामावर १५ कोटी २७ लाखांचा खर्च केला जाणार आहे. ...
देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाला (कोस्टल रोड) अखेर स्थायी समितीची मंजुरी मिळाली. त्यानुसार, प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड तयार होऊन मुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत सुसाट होणार आहे. ...