शिरपूर जैन (वाशिम) : येथे मागील आठवडाभरापासुन एका पिसाळलेल्या माकडाने हैदोस घातला असून आतापर्यंत तीन जणांना चावा घेत गंभीर जखमी केले. दरम्यान, या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाने तीन दिवस शर्थीचे प्रयत्न करूनही माकड जेरबंद करण्यात यश मिळाले नाही. ...
दरवर्षी हिवाळ्यात या अभयारण्यात विविध स्थलांतरित पक्ष्यांचे संमेलन भरलेले पहावयास मिळते. सध्या या जलाशयाच्या परिसरातील बदकांच्या विविध प्रकारांसह बगळ्यांच्या विविध जाती व करकोच्यांचे थवे विहार करताना नजरेस पडत आहेत. ...
जिल्हा दौºयावरील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयात वनरक्षक व वनपालांनी गुरुवारी दुपारी घेराव घालून जाचक परिपत्रक मागे घेण्याची मागणी केली. या संदर्भात दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले ...
राज्याच्या वनविभागातील ८७ वनपरिक्षेत्राधिका-यांना (आरएफओ) सहायक वनसंरक्षक (एसीएफ) पदी पदोन्नती मिळणार आहे. त्याअनुषंगाने नागपूर येथील वन भवनात मंगळवारी वरिष्ठ वनाधिका-यांची डीपीसी पार पडली. ही पदोन्नती शासन निर्णयानुसार खुल्या संवर्गासाठी लागू राहील ...
बुलडाणा: शेतात वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करून वाढीव रक्कम देण्यासाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना गिरडा बिटचे वनरक्षक ज्ञानेश्वर गायकवाड यास लाचलुचपत विभागाने ९ जानेवारी रोजी रंगेहात पकडले. ...
कुडाळ : तालुक्यातील तेंडोली येथील रस्त्याच्या कडेला सापडलेल्या एक महिन्याच्या नर जातीच्या बिबट्याच्या पिल्लाला तेंडोली ग्रामस्थांनी सुरक्षितरित्या वनविभागाच्या ताब्यात दिले. तेंडोली तसेच येथील पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे. बिबटे भक् ...
मायणी व मायणी परिसरामध्ये येत्या जून महिन्यात कडुनिंब, पिंपळ, चिंच या वनौषधी वनस्पतींसह एक लाख दहा हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या रोपांच्या निर्मितीचे काम मायणी वन विभागात सुरू झाले असून, हा परिसर हिरवागार होणार आहे. ...