बुलडाणा : तीन हजारांची लाच घेताना वनरक्षकाला रंगेहात अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:43 AM2018-01-10T00:43:42+5:302018-01-10T00:45:21+5:30

बुलडाणा: शेतात वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करून वाढीव रक्कम देण्यासाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना गिरडा बिटचे वनरक्षक ज्ञानेश्‍वर गायकवाड यास लाचलुचपत विभागाने ९ जानेवारी रोजी रंगेहात पकडले.

Buldhana: Three thousand bribe bribe stolen by the forest guard! | बुलडाणा : तीन हजारांची लाच घेताना वनरक्षकाला रंगेहात अटक!

बुलडाणा : तीन हजारांची लाच घेताना वनरक्षकाला रंगेहात अटक!

Next
ठळक मुद्देआरोपी : गिरडा बिटचे वनरक्षक ज्ञानेश्‍वर गायकवाड वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करुन रक्कम वाढवून देण्यासाठी स्वीकारली लाच

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शेतात वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करून वाढीव रक्कम देण्यासाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना गिरडा बिटचे वनरक्षक ज्ञानेश्‍वर गायकवाड यास लाचलुचपत विभागाने ९ जानेवारी रोजी रंगेहात पकडले.
बुलडाणा तालुक्यातील गिरडा येथील मधुकर पांडुरंग थोरात यांनी ८ जानेवारी रोजी लाचलुचपत विभाग बुलडाणाकडे तक्रार दिली होती की, वनरक्षक ज्ञानेश्‍वर गायकवाड हे त्यांच्या व त्यांच्या आईच्या नावे असलेल्या शेतीमध्ये वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करून वाढीव रक्कम देण्यासाठी ३  हजार रुपये लाचेची मागणी करीत आहेत. या तक्रारीवरून ८ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या पडताळणी कार्यवाहीमध्ये पंचासमक्ष  आरोपी वनरक्षक ज्ञानेश्‍वर माधव गायकवाड यांनी शेतीमध्ये वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करून वाढीव रक्कम देण्यासाठी ३ हजार रुपये लाचेची मागणी केली. 
त्यानंतर ९ जानेवारी रोजी केलेल्या कार्यवाहीदरम्यान जनरक्षक ज्ञानेश्‍वर गायकवाड यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारली. यावेळी लाचलुचपत विभागाचे कर्मचार्‍यांनी वनरक्षक ज्ञानेश्‍वर गायकवाड यांना ३ हजार रुपये लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले. ७, १३ (१)(ड) सह १३(२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुनीता नाशिककर, पोलीस उपअधीक्षक शैलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.

 

Web Title: Buldhana: Three thousand bribe bribe stolen by the forest guard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.