केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
ऊन, वारा, पावसात संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला सलाम आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. ...
गुरू नानक देव यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या काही गोष्टी समजाऊ शकलो नाही. कदाचित आमची तपश्चर्या कमी पडली असेल. आम्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेत ...
तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी आंदोलनाचा जबरदस्त विजय आहे, असं अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी म्हटलं आहे. ...