धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ...
‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल् ...
निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढ उतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. ...
नाशिक जिल्ह्यात फूड टेस्टिंग लॅबोरेटरी उभे करण्यासाठी सुद्धा स्मार्ट योजनेतून अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्याचे आदेश सुद्धा यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले. ...
NCP Dhananjay Munde Vs Jitendra Awhad: एखादा माणूस शुद्धीत नसल्यावर चुकीचे बोलतो, काहीही बरळतो, शुद्धीवर आल्यावर खरे कबूल करतो, तसाच हा प्रकार आहे, असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला. ...