धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
राज्यातील महत्वाचा विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची निवड आज होणार आहे.याबाबत राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बैठकीनंतरच्या सभेत नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर करणार आहेत. आगामी लोक ...
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय युद्धात आता धनंजय मुंडे विरुद्ध गिरीश बापट यांच्या संघर्षाची भर पडली आहे. मुंडे यांच्या आरोपांना बापट यांनी तितक्याच ताकदीने उत्तर दिले आहे. ...
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018'च्या मंचावर आज एक अभूतपूर्व असा योग पाहायला मिळाला. जवळपास 6 वर्षांपासून राजकारणात एकमेकांचे शत्रू म्हणून वावरत असलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या भावाबहिणींनी लोकमतच्या व्यासपी ...