Dhananjay Mundand won the Lokmat Maharashtrian Of The Year 2018 award | Lokmat Maharashtrian Of The Year 2018 : 'लोकमत'च्या 'पॉवरफुल राजकारणी' पुरस्काराबद्दल धनंजय मुंडेंचं आईकडून औक्षण

Lokmat Maharashtrian Of The Year 2018 : 'लोकमत'च्या 'पॉवरफुल राजकारणी' पुरस्काराबद्दल धनंजय मुंडेंचं आईकडून औक्षण

मुंबई -  मागील आठवड्यात धनंजय मुंडे यांचा लोकमतने "महाराष्ट्रीयन ऑफ द एयर २०१८ पॉवरफुल राजकारणी"  हा पुरस्कार देऊन गौरव केला. सध्या धनंजय मुंडे हे आपल्या भाषणानी संपूर्ण महाराष्ट्र आणि सभागृहही दणाणून सोडत आहे. अतिशय झपाटयाने त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत असून त्यांच्या या कामगिरीचे राज्यभर कौतुक होत आहे. हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा यशस्वी संपवून काल ते आपल्या जन्मगावी परळीला परतले. शनिवारी (14 एप्रिल) सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाला बाहेर पडण्यापूर्वी त्यांच्या आई श्रीमती रुक्मिणबाई मुंडे यांनी आपल्या मुलाचे औक्षवण करून कौतुक केले आशीर्वाद दिले आणि प्रेमाने मिठी मारली त्यावेळी दोन्ही माय लेकरांच्या डोळ्यातील आनंदाश्रू थांबत नव्हते.

विशेष म्हणजे घरातील हा क्षण टिपण्यासाठी कोणताही फोटोग्राफर किंवा कॅमेरामन नव्हता तर घरात काम करणा-या एका कर्मचाऱ्याने स्वतःच्या मोबाइल मध्ये नकळत हे क्षण टिपले. नंतर हे फोटो उपलब्ध करून घेत स्वतः धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या फेसबुक आणि ट्विटर वर हे फोटो टाकून जगाच्या कौतुकापेक्षा ही आईच्या या प्रेमाने मी आज तृप्त झाले अशी भावना व्यक्त करतानाच मेरी ख़्वाहिश है कि मैं फिर से फ़रिश्ता हो जाऊँ माँ से इस तरह लिपट जाऊँ कि बच्चा हो जाऊँ  या ओळीही लिहिल्या आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dhananjay Mundand won the Lokmat Maharashtrian Of The Year 2018 award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.