धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
धनंजय मुंडे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी एखादा मोटारसायकलवाला पन्नास रुपये लिटर भावाप्रमाणे पेट्रोल भरत होता. आणि आज तोच भाव ८१ रुपये जर असेल तर मोदी साहेबांनी मोटारसायकलवाल्यांची दिवसाढवळ्या रोज ३१ रुपयांची लूट केली आहे. पावणेचारशे रुपयांचे सिलेंडर एक ...
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी सत्ता यांची आहे. जनतेने एवढ सगळं एका घरात दिले. पण बीड जिल्ह्यातील जनतेला काय मिळाले, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. ...
बीड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची उमेदवारी अनपेक्षित जाहीर करून संपूर्ण बीड जिल्ह्याला आश्चर्याचा धक्का दिला. ...