धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
दहा वर्षांपूर्वी बीडमध्ये राष्ट्रवादीचे सहापैकी पाच आमदार होते. २०१४ मध्ये केवळ जयदत्त क्षीरसागर यांच्या रुपाने एक जागा राष्ट्रवादीला जिंकता आली. परंतु, २०१९ येईपर्यंत क्षीरसागर देखील राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत सामील झाले. त्यामुळे शिवसेनेला बीडमध्ये ...
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिलेल्या क्लिनचीटबाबत प्रश्न विचारला असता मुंडेंनी आक्रमक शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली ...
आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा स्लेफी व्हिडिओ आणि पूरग्रस्तांना पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो यामुळे सरकार विरोधात मोठी नाराजी पहायला मिळत आहे. ...
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी काल परळीच्या मोर्चात केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा घणाघात आ. सुरेश धस यांनी केला आहे. ...
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी काढलेल्या धडक मोर्चा आणि ७ तासांच्या ठिय्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. ...