devendra fadnavis attacks Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच भाषण ऐकायला काळा कुत्रा सुद्धा येत नाही: देवेंद्र फडणवीस

धनंजय मुंडेंच भाषण ऐकायला काळा कुत्रा सुद्धा येत नाही: देवेंद्र फडणवीस

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्यावतीने काढण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला, बीड येथील सभेत ते बोलत होते. आपल्या सभेतून विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे मोठ-मोठ्याने आवेश आणून जे भाषणे करतायत, ते ऐकायला  काळा कुत्रा सुद्धा येत नसल्याचा खोचक टोला फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना  लगावला.

राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना आमने-सामने येण्याचे आव्हान दिले होते. मुंडे यांच्या या आव्हानाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. आमना-सामना करायला माझी गरज नाही आमचे सुरेश धस हे तुम्हाला पुरून उरतील,आधी त्यांचाशी सामना करून दाखवा. तर मुंडे हे मोठ-मोठ्याने आवेश आणून आपल्या सभेत जी भाषणे करतायत ती ऐकायला काळा कुत्रा सुद्धा येत नाही, अशी अवस्था मुंडेंची झाली असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री हे खोटी आकडेवारी देत असल्याचा आरोप केला आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आकडेवारी खोटी ठरली, असे गेल्या वीस वर्षात आत्तापर्यंत  कधीच घडलं नाहीत. असा खुलासा यावेळी फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीसने सांगितलेली आकडेवारी माघे घ्यावी लागली, असे कधीच घडले नाही. अशा शब्दात त्यांनी मुंडेंना उत्तर दिले.   

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: devendra fadnavis attacks Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.