धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
शहरात पाणी टंचाईच्या काळात धनंजय मुंडेंच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेने ६ मिहने परळीकरांना टँकरने पाणीपुरवठा केला. त्यामुळे परळी शहरातून १८ हजारांवर मताधिक्क्य धनंजय मुंडे यांना मिळाले. ...
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत या किल्ल्यास जबरदस्त खिंडार पाडले. संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या परळीमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यां ...
एकूणच विधानसभेला पराभूत झाल्यामुळे पंकजा मुंडे यांचे मंत्रीपद धोक्यात आहे. तरी भाजपमध्येही काही नेत्यांसाठी अपवादात्मक स्थितीत नियम लागू होत नाही. पंकजा यांच्या बाबतीतही असंच होईल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना लागली आहे. ...
पवारांनी सातारा लोकसभा पोट निवडणुकीत आपले मित्र श्रीनिवास पाटील यांना बलाढ्य उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडून आणण्याची किमया केली. त्यामुळे पवार काका-पुतण्याची निवडून आणण्याची आणि पाडण्याची कला पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. ...
केवळ सहानुभुतीसाठी व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली, असे आरोप सोशल मीडियावर झाले होते. सुरुवातीला पंकजा यांना मिळत असलेली सहानुभुती धनंजय मुंडे यांच्याकडे वळली. एकूणच व्हिडिओ क्लिपचा फंडा भाजपवरच बुमरँग झाल्याचे परळीत पाहायला मिळाले. ...