धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
खरीप २०२३ मध्ये शासकीय जमीन दाखवून काही लोकांनी पीक विमा (Crop Insurance) भरला होता. बनावट विमा भरणाऱ्यांची नावे समोर असतानाही संबंधितावर गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे की काय, फळबाग (Horticulture) नसतानाही विमा भरल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्या ...
२०१९ च्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी पत्नी राजश्री मुंडे, वैष्णवी मुंडे, जान्हवी मुंडे आणि आदिश्री मुंडे या तीन अपत्यांचा उल्लेख केलेला आहे. तर २०२४ च्या शपथपत्रात दोन अपत्यांची नावे वाढवली आहेत ...