बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Kgf Actor Anant Nag : सुमारे चार वर्षांनंतर शाहरूख खान पठाण चित्रपटाद्वारे कमबॅक करतोय. जितकी चर्चा त्याच्या कमबॅकची झाली नाही, तितकी चर्चा या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याची झाली. आता या संपूर्ण वादावर केजीएफ फेम अभिनेता अनंत नाग यांनी प्रतिक्रिया ...
यशराज फिल्म्सच्या आगामी 'पठाण' या सिनेमाचे बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाले. चित्रपटातील पठाणचा वनवास संपणार असं दाखवण्यात आलं आहे तर खऱ्या आयुष्यात किंग खान शाहरुखचा ४ वर्षांचा वनवास संपणार आहे. ...