बायोपिक झाल्यास तुझी भूमिका कुणी करावी? भारतीय कर्णधार हरमननं घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव

deepika padukone and ranveer singh : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने तिच्या बायोपिकमध्ये कुणी तिची भूमिका साकारायला हवी याबाबत खुलासा केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 06:14 PM2023-04-19T18:14:06+5:302023-04-19T18:14:53+5:30

whatsapp join usJoin us
Indian women's team captain Harmanpreet Kaur has said that if there is a biopic on me, Bollywood actress deepika padukone should play my role and I would like to go on a date with actor ranveer singh  | बायोपिक झाल्यास तुझी भूमिका कुणी करावी? भारतीय कर्णधार हरमननं घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव

बायोपिक झाल्यास तुझी भूमिका कुणी करावी? भारतीय कर्णधार हरमननं घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

harmanpreet kaur । नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने तिच्या बायोपिकमध्ये कुणी तिची भूमिका साकारायला हवी याबाबत खुलासा केला आहे. हरमनने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव घेऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. खरं तर बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते जगजाहीर आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी क्रिकेटपटूंच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारली आहे. भारतीय पुरूष संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या 'द अनटोल्ड स्टोरी' बायोपिकमध्ये दिवंगत अभिनेता सुशात सिंग राजपूतने कॅप्टन कूलची भूमिका साकारली होती.

याशिवाय भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजच्या 'शाब्बास मिथू' या बायोपिकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने मितालीची भूमिका साकारली आहे. अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित हरमनप्रीत क्रिकेटच्या जगात ठसा उमटवण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या अनेक तरुणींसाठी एक आदर्श आहे. मिर्ची प्लसवरील शोमध्ये अभिनेत्री करीना कपूरसोबत 'स्त्रियांची इच्छा काय असते' या खास कार्यक्रमात हरमनप्रीतला तिच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारला असता तिने अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या नावाला पसंती दर्शवली. 

दीपिका पादुकोणला दिली पसंती 
हरमनप्रीत कौरने म्हटले, "होय, दीपिका पादुकोण, कारण ती एका स्पोर्ट्स कुटुंबातील आहे आणि तिला खेळाबद्दल पुरेशी माहिती आहे. तिचे थलेटिक्ससारखे शरीर आहे. मला वाटते की, संधी मिळाली तर ती ही भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकेल. तसेच या चॅटमध्ये करिनाने हरमनला कोणत्या अभिनेत्यासोबत डेटवर जायला आवडेल असे विचारले असता हरमनने क्षणाचाही विलंब न करता प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगचे नाव घेतले. 

हरमनप्रीतचा मोठा खुलासा 
रणवीरबद्दल बोलताना हरमनने म्हटले, "मला रणवीर सिंग खूप आवडायचा. पण तो आधीच विवाहित आहे. पण गोष्ट अशी आहे की, तो तसा नसून खूप मजेदार आहे, तो खूप सक्रिय असतो. त्याला जे करायला आवडते तेच तो करतो आणि लोक काय याची तो पर्वा करत नाही. त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व मला खूप आवडायचे. तेव्हा मला संधी मिळाली असती तर मी विचार केला असता, पण आता त्याचे लग्न झाले आहे, त्यामुळे मी इतर कोणाचाही विचार केला नाही." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Indian women's team captain Harmanpreet Kaur has said that if there is a biopic on me, Bollywood actress deepika padukone should play my role and I would like to go on a date with actor ranveer singh 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.