'दे केरल स्टोरी'पूर्वी 'या' चित्रपटांचाही वाद, इंदिरा गांधींनीही आणली होती बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 01:08 PM2023-05-09T13:08:26+5:302023-05-09T13:17:24+5:30

बॉलिवूड चित्रपट आणि वाद काही नवा नाही. मात्र, या चित्रपटाच्या वादात राजकारण शिरल्यानंतर चित्रपटाचं एकतर मोठं आर्थिक नुकसान होतं किंवा मोठा फायदा होतो. सध्या द केरला स्टोरी चित्रपटावरुन चांगलाच वाद सुरू आहे.

बॉलिवूड चित्रपट आणि वाद काही नवा नाही. मात्र, या चित्रपटाच्या वादात राजकारण शिरल्यानंतर चित्रपटाचं एकतर मोठं आर्थिक नुकसान होतं किंवा मोठा फायदा होतो. सध्या द केरला स्टोरी चित्रपटावरुन चांगलाच वाद सुरू आहे.

काहि दिवसांपूर्वी देशात द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन वादंग उठलं होतं. काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणारा हा चित्रपट असल्याचं सांगत भाजप नेत्यांनी या चित्रपटाचं जोरदार प्रदर्शन केलं होतं.

आता, द केरळ स्टोरी चित्रपटालाही समर्थन आणि विरोध होत असल्याने चित्रपटाची सोशल मीडियासह सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. काही राज्यात या चित्रपटावर बंदी घालण्यात आलीय. तर काही राज्यात टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

चित्रपटाचे वाद केवळ आत्ताच होत नाहीत, तर १९७० च्या दशकातही चित्रपटावरुन वाद निर्माण झाले आहेत. आता, द केरळ स्टोरी आणि काश्मीर फाईल्स चित्रपटावरुन झालेले वाद आपण पाहात आहोत. पण, यापूर्वीही असे वाद झाले आहेत.

द काश्मीर फाईल्स - विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या द काश्मीर फाईल्स चित्रपटावरुन मोठा वाद झाला होता. काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय दाखवताना, चित्रपटाने ठराविक प्रोपागंडा चालवल्याचा आरोप दिग्दर्शकावर झाला होता.

आंधी - १९७० साली आलेल्या या चित्रपटावरही वाद आणि राजकारण झाले होते. या चित्रपटाला तत्कालीन पंतप्रधानांनी बंदी घातली होती. त्यावेळी, देशात इंदिरा गांधींचं सरकार होतं. इंदिरा गांधींशी निगडीत घटना असल्याने या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.

पद्मावत - बॉलिवूड अभिनेत्री दीपीका पदुकोणचा पद्मावत हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्या सापडला होता. राजपूत करणी सेनेनं या चित्रपटाला विरोध केला होता. पद्मिनी आणि खिलजी यांच्यातील सीनवरुन करणी सेनेनं संताप व्यक्त करत चित्रपटावर बंदीची मागणी केली होती.

बाजीराव मस्तानी - निर्माता संजय लीला भन्साळीच्या बाजीराव-मस्तानी चित्रपटावरुन ही वाद निर्माण झाला होता. पेशवा बाजीराव यांच्या वंशजांनी, चित्रपटात बाजीराव आणि मस्तानी हे पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप केला होता.

तसेच, पिंगा-पिंगा गाण्यात दीपिका पदुकोण आणि प्रिंयका चोप्राने परिधान केलेल्या ड्रेसवरुनही वाद झाला होता. त्यावरुन, चित्रपटाच्या निर्मात्याला एक पत्रही पाठवण्यात आलं होतं.

पानीपत - या चित्रपटातील जाट महाराज सूरजमल यांच्या चरित्र दर्शनावरुन जाट समुदायाने चित्रपटाला विरोध केला होता. राजस्थान, हरयाणा आणि प. उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी या चित्रपटाचा विरोध करण्यात आला होता.

चित्रपटात महाराजा सूरजमल हे अफगान शासक अहमद शाह अब्दालीविरुद्धच्या लढाईत मराठा सैन्याला मदत करण्यासाठी आग्रा किल्ल्याची मागणी करतात. ही अट मान्य न केल्यामुळे ते मराठा सैन्याची साथ देत नाहीत, असा दाखवण्यात आले होते. त्यावरुन, हा वाद रंगला होता.