'पठाण'ने रचला नवा इतिहास; 1971 नंतर बांग्लादेशमध्ये रिलीज होणार पहिला हिंदी सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 03:46 PM2023-05-05T15:46:54+5:302023-05-05T15:47:40+5:30

Pathaan: तब्बल 52 वर्षानंतर बांग्लादेशमध्ये बॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे.

shah rukh khan pathaan now the first film to release in bangladesh after 1971 | 'पठाण'ने रचला नवा इतिहास; 1971 नंतर बांग्लादेशमध्ये रिलीज होणार पहिला हिंदी सिनेमा

'पठाण'ने रचला नवा इतिहास; 1971 नंतर बांग्लादेशमध्ये रिलीज होणार पहिला हिंदी सिनेमा

googlenewsNext

Pathaan Release Date In Bangladesh: अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा बॉक्स ऑफिसवर गाजलेला पठाण हा सिनेमा एका मागून एक विक्रम रचत चालला आहे. बॉक्स ऑफिसवर  या सिनेमाने सगळे रेकॉर्ड ब्रेक केले असून तब्बल 1050 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या यशाची गाडी काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. यामध्येच आता या चित्रपटाने नवा विक्रम रचला आहे. बांग्लादेशमध्ये हा सिनेमा रिलीज होणार असून तब्बल 52 वर्षानंतर तेथे रिलीज होणारा हा पहिला हिंदी सिनेमा आहे.

बांग्लादेशमध्ये या दिवशी रिलीज होणार 'पठाण'

बांग्लादेशमध्ये तब्बल 52 वर्षांनी रिलीज होणाऱ्या सिनेमाचा मान पठाणला मिळाला असून येथील प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा सिनेमा येत्या १२ मे रोजी येथील प्रदर्शित होणार आहे. "सिनेमा कायम राष्ट्र, जात, संस्कृती यांना जोडणारा एक दुवा आहे. तो अनेक मर्यादा ओलांडून लोकांना एक करतो, त्यांना प्रेरणा देतो. आणि, महत्त्वाचं म्हणजे लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच आम्ही जगभरात गाजत असलेला पठाण बांग्लादेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमालीचे उत्सुक आहोत", असं इंटरनॅशनल डिस्ट्रीब्यूशनचे व्हॉइस प्रेसिडेंट नेल्सन डिसूझा यांनी याविषयी माहिती दिली.

पुढे ते म्हणतात, "पठाण हा 1971 नंतर बांग्लादेशमध्ये प्रदर्शित होणारा पहिला हिंदी सिनेमा आहे. आणि हा सिनेमा येथे रिलीज करण्याचा निर्णय घेणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये बांग्लादेशमध्ये शाहरुखच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढतीये. त्यामुळे येथे त्याचा सिनेमा रिलीज करणं हा योग्य निर्णय आहे."

दरम्यान, चार वर्ष ब्रेक घेतल्यानंतर शाहरुखने पठाणच्या माध्यमातून पुन्हा कमबॅक केलं होतं. या सिनेमाच्या माध्यमातून त्याने पहिल्यांदाच जॉन अब्राहमसोबत स्क्रीन शेअर केली. तसंच या सिनेमात सलमान खानदेखील कॅमियो रोलमध्ये झळकला आहे. या सिनेमानंतर शाहरुख लवकरच जवानमध्ये झळकणार आहे.
 

Web Title: shah rukh khan pathaan now the first film to release in bangladesh after 1971

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.