Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
तुम्ही दहीकाल्याची हंडी फोडा, आम्ही श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेऊन अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराची हंडी फोडू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदा पथकांना सोमवारी शुभेच्छा दिल्या. ...
केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी सकाळी क-हाडात भाजपाच्या पापाचा प्रतीकात्मक घडा फोडला. ‘या सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय,’ अशा घोषणांनी या वेळी परिसर दणाणून गेला. ...
केरळमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक मंडळांनी यावर्षी दहीहंड्या रद्द केल्या, परंतु काही मंडळांनी आपली परंपरा कायम ठेवत यावेळी दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून जनप्रबोधनाचा वसा घेतला. ...
रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी दहीहंडीचा उत्सव अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला. तब्बल ७ हजार ३०९ दहीहंड्या परिसरात उभारण्यात आल्या होत्या. विविध सिनेमातील गाणी तसेच पारंपरिक वाद्यांच्या तालावर गोविंदा पथकांनी गोविंदा रे गोपाळा म्हणत ठेका धरला होता. ...
‘गोविंदा, गोविंदा’चा प्रचंड जयघोष, ‘मैं हू डॉन, ‘झिंग झिंग झिंगाट’ अशा एकाहून एक सरस गीतांचे सादरीकरण आणि दहीहंडी फोडण्यासाठी रचणारे थरावर थर, अशा जल्लोषमय वातावरणात सोमवारी शहर अवघे गोविंदामय झाले. सहा ते सात थर लावण्यासाठी गोविंदा पथकांची स्पर्धा आ ...
नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हाथी-घोडा पालखी, जय कन्हैया लाल कीच्या जयघोषात मुक्तिधामसह शहरातील विविध मंदिरांत व घराघरांमध्ये रविवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ...
जीबीएस अर्थात गोसावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वाहतूक प्रबोधनपर दहीहंडी सण साजरी करण्यात आला. यात वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात संस्थेच्या या प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी वाहतुकीसंदर्भात फलक दर्शवून यंदाची दहीहंडी ही कुठलाही अमाप खर्च न करता साजर ...