देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
ज्येष्ठ अधिवक्ता सिंघवी म्हणाले, आमची तक्रार असूनही पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या नावाचा उल्लेख निवडणूक आयोगाच्या कोणत्याही कागदपत्रात नाही. आयोगाने कोणालाही ताकीद दिली नाही किंवा कोणतेही निर्बंध लादले नाहीत. ...
प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हरयाणात भाजपमुळे राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. त्या गोष्टीला आता जनता कंटाळली आहे. ...
जात, धर्म, भाषा, समुदाय यांचा आधार घेऊन भाजप व काँग्रेसने निवडणुकांत प्रचार करू नये, असा इशारा या दोन्ही पक्षांना निवडणूक आयोगाने बुधवारी दिला होता. संरक्षण दलांविषयीच्या धोरणांबद्दल तसेच त्या दलांच्या सामाजिक-आर्थिक रचनेबाबत फूट पाडणारी विधाने करू न ...
‘भारताने पाकिस्तानशी संवाद साधावा आणि आपली लष्करी ताकद दाखविण्याचा प्रयत्न करू नये, कारण तसे केल्यास पाक आपली अण्वस्त्रे तैनात करील, आपण त्यांचा आदर केला पाहिजे,” असा इशारा मणिशंकर अय्यर यांनी दिला होता. ...
Pune Accident News: पुणे अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून केली आहे. ...
Lok Sabha Election 2024: पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामध्ये. भाजपाने (BJP) ३१० जागांचा टप्पा ओलांडला. आहे. तर काँग्रेसला (Congress) यावेळी ४० जागाही मिळणार नाहीत, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामधून इंडिया आघाडीचा ...