"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 03:59 PM2024-05-23T15:59:39+5:302024-05-23T16:12:47+5:30

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे.

Prashant Kishor: "Keep lots of water close on June 4", Prashant Kishor slams critics | "4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा

"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा

Prashant Kishor Lok Sabha : प्रसिद्द निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान, प्रशांत किशोर विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत ​​आहे, ज्यात ते लोकसभा निवडणुकीबाबत मोठे दावे करत आहेत. एकेकाळी भाजपसोबत असणाऱ्या पीकेंनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होणार असल्याचा दावा केला आहे. पण, त्यांच्या या वक्तव्यावर विरोधक सातत्याने टीका करत करताना दिसत आहेत.

पीकेंचा विरोधकांना सल्ला...
दरम्यान, आपल्या टीकाकारांवर निशाणा साधत प्रशांत किशोर यांनी 4 जून रोजी त्यांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, "पाणी पिणे चांगले आहे. यामुळे मन आणि शरीर हायड्रेट राहते. निवडणुकीबाबत माझे मूल्यांकन पाहून ज्यांना आश्चर्य वाटते, त्यांनी 4 जून रोजी भरपूर पाणी हाताशी ठेवावे," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 

बंगालच्या निवडणुकीचा संदर्भ 
या पोस्टमध्ये त्यांनी "माझ्या दाव्याची खिल्ली उडवणाऱ्यांनी बंगालचा निकाल लक्षात ठेवावा", असे म्हटले आहे. विशेष म्हणजे, 2021 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप तिहेरी आकडा गाठणार नाही, असे पीकेंनी म्हटले होते आणि झालेही तसेच. पण, त्यावेळी अनेक वाहिन्यांनी भाजपच्या विजयाचा दावा केला होता.

Web Title: Prashant Kishor: "Keep lots of water close on June 4", Prashant Kishor slams critics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.