देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
शंकरनगर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या बैठकीत ‘खतगावकर दादां’नी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. ...
Congress Balasaheb Thorat News: भाजपाच्या फेक नॅरेटिव्हला जनता भुलणार नाही. भाजपा संविधान, आरक्षणविरोधी आहे, हे सत्य जनतेला माहिती आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...
Congress Prithviraj Chavan News: लोकसभेपेक्षा विधानसभेला अधिक यश मिळेल. महायुतीला १०० जागा मिळणार नाहीत. हे सरकार घालवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ...
Congress Ramesh Chennithala News: राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढून देश जोडण्याचे काम केले. डरो मत असा संदेश दिला, असे सांगत रमेश चेन्नीथला यांनी भाजपावर टीका केली. ...