देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rahul Gandhi Speech: सर्व महापुरुषांचे विचार या संविधानात आहेत. प्रधानमंत्री आणि त्यांची टीम लपून संविधानाची हत्या करतात, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ...
आज शिर्डी येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही आव्हान दिले. ...
Ajit pawar News: मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहात का या प्रश्नावर अजित पवारांनी आपण शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. परंतू, निकालानंतर महायुती विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदावर निर्णय होईल असे ते म्हणाले. ...
निवडणुकीच्या राजकारणात महाराष्ट्रात व्होट जिहादचा मुद्दा तापला आहे. मौलाना सज्जाद नोमानी यांनी उमेदवारांची यादी देत मुस्लीम समाजाला त्यांना मत देण्याचे आवाहन केले आहे. ...