देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार असून,चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये असे तावडे म्हणाले होते. ...
शिवसेना-भाजप युती गेल्या कित्येक दिवसांपासून रेंगाळली होती. अखेर उभय पक्षांनी युतीची कोंडी फोडून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांना तगडे आव्हान मिळणार आहे. ...
शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये जागा वाटपावरून संघर्ष निर्माण होत आहे. हा संघर्ष असाच कायम राहिल्यास, आघाडीसाठी संधी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेला स्थानिक नेत्यांची समजूत काढणे गरजेचे बनले आहे. ...
काँग्रेस पक्ष ज्या उमेदवाराचा प्रचार करण्यास सांगेल त्यांचा आपण प्रचार करणार असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले होते. आपण काँग्रेससोबत असल्याची त्यांनी पुष्टी दिली होती. त्यानंतर संध्याकाळी काँग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत राहुल बोंद्रे यांची उम ...