''निवडणुकीत आघाडीवाल्यांचा सुफडा साफ होऊन नक्की महाराष्ट्र स्वच्छ होणार''

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 01:39 PM2019-10-02T13:39:14+5:302019-10-02T13:42:45+5:30

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे.

"Maharashtra will be cleansed by clearing the lead in elections" | ''निवडणुकीत आघाडीवाल्यांचा सुफडा साफ होऊन नक्की महाराष्ट्र स्वच्छ होणार''

''निवडणुकीत आघाडीवाल्यांचा सुफडा साफ होऊन नक्की महाराष्ट्र स्वच्छ होणार''

Next

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतलेल्या भारतीय जनता पार्टीने रम्या या काल्पनिक पात्राच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करत आहे. भाजपाने आज महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने रम्याच्या माध्यमातून आघाडीवर कुरोघोडी करत टीका केली आहे. 

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. त्यातच भाजपाने गेल्या काही दिवसांपासून रम्याच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधत आहे. त्यातच आज महात्मा गांधी यांची 150वी जयंतीच्या निमित्ताने आघाडीवर निशाणा साधला आहे.

 देशाभरात स्वच्छता आभियान राबविण्यात येत आहे. भाजपाने याच धाग्याला धरुन रम्याच्या माध्यमातून  महात्मा गांधी यांचा स्वप्नातला स्वच्छ भारत हळू हळू साकारतो आहे. परंतु संपूर्ण भारताचं राहू दे सध्या पण आता युती झाल्यामुळे या निवडणुकीत आघाडीवाल्यांचा सुपडा साफ होऊन नक्की महाराष्ट्र स्वच्छ होणार असल्याचे बोलत आघाडीवर टीका करण्यात आली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून रम्याच्या माध्यमातून भाजपाने विरोधकांना लक्ष्य केलं आहे. भाजपाने भाजपाने रम्याच्या माध्यमातून याआधीही शरद पवारांवर ईडी चौकशीच्या विषयावरुन टोला लगावला होता. तसेच भाजपाने गेल्या काही दिवसांत घडलेल्या नाट्यावरुन तसेच ईव्हीएम, कलम 370 आणि राष्ट्रवादीच्या सभेत भगवा झेंडा असण्याच्या विधानावर भाजपाने शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

Web Title: "Maharashtra will be cleansed by clearing the lead in elections"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.