देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरून काँग्रेसच्या आमदाराने मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे (युबीटी) आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसने आमदारांना समज द्यावी, असे ठाकरे म्हणाले. ...
भारतीय जनता पक्षाच्या खासदारांमध्ये झालेल्या गोंधळात माझ्या गुडघ्याला दुखापत झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही लिहिले आहे. ...
पाटकर म्हणाले, अदानीविरोधात जेव्हा विरोधी पक्ष आवाज उठवतात, आंदोलन करतात, तेव्हा मोदी सरकार पोलिसांना पुढे करून विरोधकांवर कारवाई करायला लावते. सरकार विरोधकांचा आवाज दाबू पाहत आहे. ...
Pratap Sarangi: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचे गुरूवारीही संसदेत पडसाद उमटले. विरोधक-सत्ताधारी खासदार आमने सामने आले. यावेळी प्रवेशद्वाराजवळ भाजपचे दोन खासदार खाली पडून जखमी झाले. यात एक आहेत, प्रताप सारंगी... ...
Rahul Gandhi, Pratap Sarangi News: प्रताप सारंगी व अन्य एका भाजप खासदाराला दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल ...
Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यावर भाजपा खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना धक्का देऊन खाली पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र यावर आता राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...