चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
Chandrayaan 3 : 'चंद्रयान ३'च्या यशानंतर संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण आहे. भारतीय मनोरंजन विश्वातील तारे-तारकांनीही सोशल मीडियाद्वारे आपला आनंद व्यक्त केला आहे. ...
मंगल प्रभात लोढा यांनी देखील नागरिकांसाठी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण दाखवण्यासाठी मुंबईमधील सर्वात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...