lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चंद्रयान-3 च्या यशामुळे उद्योगजगतात आनंदाची लाट; अदानी-महिंद्रांनी केले ISRO चे अभिनंदन...

चंद्रयान-3 च्या यशामुळे उद्योगजगतात आनंदाची लाट; अदानी-महिंद्रांनी केले ISRO चे अभिनंदन...

Chandrayaan-3 Mission: चंद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यामुळे संपूर्ण भारतात उत्साहाचे वातावरण आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 09:11 PM2023-08-23T21:11:37+5:302023-08-23T21:12:14+5:30

Chandrayaan-3 Mission: चंद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यामुळे संपूर्ण भारतात उत्साहाचे वातावरण आहे.

Chandrayaan 3 Successfully Lands On The Moon, Business Leaders Tweets Adani Mahindra | चंद्रयान-3 च्या यशामुळे उद्योगजगतात आनंदाची लाट; अदानी-महिंद्रांनी केले ISRO चे अभिनंदन...

चंद्रयान-3 च्या यशामुळे उद्योगजगतात आनंदाची लाट; अदानी-महिंद्रांनी केले ISRO चे अभिनंदन...

Chandrayaan-3 Mission:भारतीय अंतराळ संस्था isro चे चंद्रयान-3 मिशन यशस्वी झाले आहे. चंद्रयान-3 चे विक्रम लँडर आज चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. या यशस्वी मोहिमेमुळे उद्योगजगतातही आनंदाची लाट उसळली आहे. पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन, आनंद महिंद्रा यांच्यासह अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांनी इस्रो आणि देशाचे अभिनंदन केले आहे. 

काय म्हणाले गौतम अदानी?
चंद्रयान-3 च्या यशाबद्दल उद्योगपती गौतम अदानी यांनी ट्विट करुन इस्रोचे अभिनंदन केले. गौतम अदानी म्हणाले की, तुम्ही खरोखर देशाची शान आहात. देशाच्या अंतराळ मोहिमेला यशस्वी निष्कर्षापर्यंत नेण्याची तुमची क्षमता तुमचा आत्मविश्वास दर्शवते की, ही भारताची वेळ आहे. देशातील 1.4 अब्ज नागरिकांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. जय हिंद.

आनंद महिंद्रा यांनी केले अभिनंदन 
आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन चंद्रयान-3 च्या यशाबद्दल इस्रोचे अभिनंदन केले. आनंदा महिंद्रा यांनी लिहिले की, इस्रोचे आभार, आम्हाला ताऱ्यांपर्यंत कसे पोहोचायचे, ते तुमच्याकडून शिकायचे आङे. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. आपल्या अपयशाला कसे सामोरे जायचे आणि पुढे कसे जायचे हे शिकले पाहिजे. आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान आहे.

भारतासाठी अभिमानाचा क्षण
भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले की, प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. भारताच्या अंतराळ आणि तंत्रज्ञानाच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यातून येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल. एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिष कुमार चौहान म्हणाले की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग केल्याबद्दल देशवासीयांचे आणि इस्रोचे अभिनंदन. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे.

 

Web Title: Chandrayaan 3 Successfully Lands On The Moon, Business Leaders Tweets Adani Mahindra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.