Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या . Read More
अर्थसंकल्पाच्या नावावर राजकीय हाराकीरी थांबवून राष्ट्रनिर्मितीचा संकल्प धारण करावा व त्या संकल्पाला "अर्थ" यावा जनमानसात ही आपल्या प्रश्नांच्या मुळांचा अभ्यास या निमित्ताने व्हावा एवढी अपेक्षा राष्ट्राच्या पुढील संपन्न वाटचालीसाठी बाळगूया! काम करू शक ...
हंगामी अर्थमंत्र्यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला, असे म्हटले असले तरी तो प्रत्यक्षात पूर्णच अर्थसंकल्प होता. त्यात आयकर कायद्यात बदलसुद्धा प्रस्तावित केले होते. ...
काहीतरी पदरी पडेल, या आशेवर ज्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते, तो प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केला. तो करताना कसबी, मुरब्बी अर्थतज्ज्ञाप्रमाणे वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी फटकेबाजीही केली. ...
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 27 फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडणार आहेत. ...
संसदेतील विविध पक्षाच्या महिला खासदारांनी एकत्र जेवण केल्यानंतर काहीसा विरंगुळा म्हणून पारंपारिक फुगडी खेळाचा मनमुराद आनंद लुटला. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. ...
अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या अंतरिम बजेटमध्ये रेल्वेला बम्पर रक्कम दिली आहे; पण रेल्वेचे असे म्हणणे आहे की, जुलैतील आगामी पूर्ण बजेटमध्ये रेल्वेचे भाडे वाढविण्याची परवानगी दिली जावी. ...