विद्यार्थिंनीना सडकसख्याहरींकडून मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याने याचा परिणाम विद्यार्थिनींच्या मानसिकतेबरोबरच शिक्षणावर होत असल्याचे दिसून येत आहे. ...
येथील विविध मटका अड्ड्यावर छापा टाकत यावेळी १८ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ४० मोबाईल व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. बुकी मालक फरार होण्यात यशस्वी झाला आहे. त्याचा शोध परळी पोलीस घेत आहेत. ...
महायुतीबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असून प्राथमिक चर्चा झालेली आहे. शिवसंग्रामने राज्यात १२ जागांची मागणी केली असून यात बीडचाही समावेश आहे. बीडची जागा शिवसंग्रामलाच मिळेल, असा विश्वास युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी व्यक्त केला. ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये बीड शहर हागणदारीमुक्त करून स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. पालिकेने सर्व सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी बल्ब, पाण्याची टाकी, तोट्या, आरसे व इतर साहित्य बसवून ते सुविधायुक्त केले. ...
जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता खरिप हंगामातील कडधान्य व बहूतांश ठिकाणी सोयाबीन हे पिक वाया गेले आहे. या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. ...
ऊसतोडणी कामगारांनी संघटीत होऊन संघर्ष केल्याशिवाय त्यांचे काहीच कल्याण होणार नाही. कामगारांनी ढोंगी नेतृत्व झुगारून लाल झेंड्याच्या नेतृत्वाखाली लढा उभारावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र उसतोडणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. दत्ता डाके यांनी केले. ...
जिल्ह्यात यंदाही पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे वातावरण होते. मागील दोन तीन दिवसांत सौम्य स्वरुपाच्या पावसामुळे दिलासा मिळत असला तरी मागील दोन वर्षांतील पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यात कोरड्या दिवसांचे प्रमाण सारखेच २७ इतके आहे. ...