दसरा चौक येथील ऐतिहासिक मुस्लिम बोर्डिंगच्या पटागणांवर शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करीत केवळ पाच मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत बकरी ईदची नमाज पठण करण्यात आली. मौलाना मुबिन बागवान यांनी ईदची नमाज आणि खुतबा पठण केले. ...
बकरी ईदनिमित्त समाजबांधवांची सकाळपासूनच लगबग पहावयास मिळत होती. नमाजपठण सामुहिकरित्या न करता नवीन कपडे परिधान करून अबालवृध्दांनी आपापल्या घरांमध्येचे नमाजपठण, कुराणपठण करण्यास प्राधान्य दिले. ...
"सरकारने बकरी ईद निमित्त कुर्बानी देणे अवघड केले आहे. एवढेच नाही, तर बकरांची ऑनलाईन खरेदी विक्री करण्यातही अडचणी आणल्या जात आहेत. बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत" ...