ईदगाह मैदान सुने : शहरात बकरी ईद साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 04:07 PM2020-08-01T16:07:48+5:302020-08-01T16:12:04+5:30

बकरी ईदनिमित्त समाजबांधवांची सकाळपासूनच लगबग पहावयास मिळत होती. नमाजपठण सामुहिकरित्या न करता नवीन कपडे परिधान करून अबालवृध्दांनी आपापल्या घरांमध्येचे नमाजपठण, कुराणपठण करण्यास प्राधान्य दिले.

Eidgah Maidan Sune: Goat Eid is simply celebrated in the city | ईदगाह मैदान सुने : शहरात बकरी ईद साधेपणाने साजरी

शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर शुकशुकाट

googlenewsNext
ठळक मुद्देसामुहिक नमाजपठण रद्दघराघरांमधून प्रार्थनेचे सूरसोशलमिडियावर शुभेच्छांचा वर्षाव

नाशिक : कोव्हिड-१९ अर्थात कोरोना संक्रमणाचा फैलाव शहर व परिसरात अधिक वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात मुस्लीम बांधवांनी बकरी ईद (ईद-उल-अज्हा) शनिवारी (दि.१) अत्यंत साधेपणाने साजरी केली. सामुहिकरित्या विशेष नमाजपठणाचा सोहळा पुर्णपणे रद्द केला गेला. यामुळे शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर शुकशुकाट पहावयास मिळाला.
त्याग, बलिदानाची शिकवण देणारा बकरी ईदचा सण अगदी साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह शहरातील विविध धर्मगुरू व उलेमांनी केले होते. सामुहिकरित्या ईदगाहवर तसेच विविध मशिदींमध्ये नमाजपठणासाठी गर्दी करू नये, असेही सांगण्यात आले होते. यानुसार शहरातील मशिदींसह ईदगाहवरसुध्दा शनिवारी सामुहिक नमाजपठण केले गेले नाही. ईदगाहवर पुर्वसंध्येपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच शनिवारी सकाळी जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड, सातपूर, देवळाली गाव, विहितगाव, देवळाली कॅम्प या भागांमध्ये मुस्लीमबहुल मोहल्ल्यांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बकरी ईदनिमित्त समाजबांधवांची सकाळपासूनच लगबग पहावयास मिळत होती. नमाजपठण सामुहिकरित्या न करता नवीन कपडे परिधान करून अबालवृध्दांनी आपापल्या घरांमध्येचे नमाजपठण, कुराणपठण करण्यास प्राधान्य दिले. यामुळे घराघरांमधून प्रार्थनेचे सुर सकाळी ऐकू येत होते. तसेच गल्ली-मोहल्ल्यातसुध्दा नागरिकांनी गर्दी न करता एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यंदा कोरोनाचे सावट रमजान ईदप्रमाणेच बकरी ईदवर असल्यामुळे अलिंगण व हस्तांदोलन करत शुभेच्छा देणे अनेकांनी टाळले.
 

Web Title: Eidgah Maidan Sune: Goat Eid is simply celebrated in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.