7 फेब्रुवारी 2018 पासून ऑटो एक्सपो 2018 ची सुरुवात होणार आहे. देश-विदेशातील बड्या कार कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होताहेत. त्यामुळे या प्रदर्शनात नवनवे आवि'ष्कार' पाहायला मिळणार आहेत. कारप्रेमींना 9 ते 14 फेब्रुवारीपर्यंत या एक्स्पोला भेट देता येईल आणि ही त्यांच्यासाठी पर्वणीच असेल. तिथल्या सर्व बातम्या, नव्या कारचं लाँचिंग, व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे ऑटो एक्स्पोबद्दलचे अपडेट्स पाहण्यासाठी वाचत राहा लोकमत डॉट कॉम. Read More
स्वीडनची प्रसिद्ध कार कंपनी वॉल्व्होनं भारतातील स्वतःच्या कार व्यवसायाचा पसारा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 4 जुलै रोजी सर्वात छोटी एसयूव्ही Volvo XC40 ही कार भारतात लाँच करणार आहे. ...
दरवर्षी सुमारे ३० लाख नवीन वाहने भारतीय रस्त्यांवर येतात. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. त्यावर‘भारत स्टेज ६’ (बीएस व्हीआय) हे इंजिन सुयोग्य ठरणार आहे. प्रदूषणावर मात करण्याच्या केंद्राच्या धोरणाला अनुसरून कंपन्यांनी विचारविनिमय सुरू केला आहे. ...
वाहनांचे प्रदूषण कळीचा मुद्दा ठरल्याने पर्यावरणानुकुल गाड्या तयार व्हाव्यात, यासाठी अनेक प्रयत्न आजवर झाले. मात्र केवळ धूर कमी होण्यापेक्षा कार्बन उत्सर्जनच झालेच नाही तर? हे शक्य असणारी हायड्रोजन गाडीच येऊ घातली आहे. ...
भारतीय कार बाजार हा झपाट्याने आरामदायी अर्थात, लक्झरी श्रेणीकडे जात आहे. भारतीय कार मालकांमधील अशा गाड्यांची ‘क्रेझ’ जोमाने वाढत असल्याचे चित्र येथे सुरू असलेल्या आॅटो एक्स्पोत प्रकर्षाने समोर येते. ...
आधुनिक युगात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन तर आला पण स्मार्ट गाड्या आल्या तर... हो अशा गाड्या भारतातही येऊ घातल्या आहेत. मात्र त्या गाड्या नसून तो एकप्रकारे ‘रोबो’च असेल. अशा या कन्सेप्ट गाड्यांची न्यारी दुनिया आॅटो एक्स्पो २०१८ मध्ये अनुभवयास येते. ...