अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
सर्व विरोधी पक्ष भाजपा विरोधात एकत्र आले तर चित्र बदलू शकते हे पोटनिवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे. राज्यात बसपासह प्रकाश आंबेडकर यांची भारिप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस यासह समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा सकारात्मक विचार आम्ही आधीच मांडला आहे ...
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा नाही तर साम, दाम, दंड, भेदाचा विजय झाला असून भाजपला या विजयाचा उत्सव साजरा करण्याचा अधिकार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...
काँग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक बुथवर भाजपाच्या पगारी कार्यकर्त्यांचा पराभव करेल असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. चव्हाण यांनी व्यक्त केला. ...