विरोधकांनी किमान समान कार्यक्रम ठरवावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:47 AM2018-06-14T00:47:45+5:302018-06-14T00:47:56+5:30

सर्व विरोधी पक्ष भाजपा विरोधात एकत्र आले तर चित्र बदलू शकते हे पोटनिवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे. राज्यात बसपासह प्रकाश आंबेडकर यांची भारिप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस यासह समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा सकारात्मक विचार आम्ही आधीच मांडला आहे. याला सहकारी पक्षांकडून प्रतिसाद आला तर पुढे जाता येईल. आता सर्व विरोधी पक्षांची एकत्र बसण्याची प्रक्रिया सुरु व्हावी. त्यासाठी एक किमान समान कार्यक्रम ठरवावा, असे मत व्यक्त करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

Opponents should decide at least the paralal program | विरोधकांनी किमान समान कार्यक्रम ठरवावा 

विरोधकांनी किमान समान कार्यक्रम ठरवावा 

Next
ठळक मुद्देअशोक चव्हाण : विरोधकांची एकत्र बसण्याची प्रक्रिया सुरू व्हावी

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : सर्व विरोधी पक्ष भाजपा विरोधात एकत्र आले तर चित्र बदलू शकते हे पोटनिवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे. राज्यात बसपासह प्रकाश आंबेडकर यांची भारिप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस यासह समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा सकारात्मक विचार आम्ही आधीच मांडला आहे. याला सहकारी पक्षांकडून प्रतिसाद आला तर पुढे जाता येईल. आता सर्व विरोधी पक्षांची एकत्र बसण्याची प्रक्रिया सुरु व्हावी. त्यासाठी एक किमान समान कार्यक्रम ठरवावा, असे मत व्यक्त करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
अ.भा काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी जाऊन धानाच्या एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण होते. नागपुरात परतल्यावर चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, विरोधकांच्या मत विभाजनाचा भाजपाला थेट फायदा होतो. पालघरच्या निवडणुकीत तसेच झाले. भाजपाला फक्त ३० टक्के मते मिळाली. उर्वरित ७० टक्के मते विरोधी पक्षाला मिळाली. येथे विरोधक एकत्र आले असते तर पालघरचेही चित्र वेगळे असते. भाजपा विरोधी लढा उभारण्याची काँग्रेसची इच्छा आहे. तसे पाऊलही पुढे टाकले आहे. आता इतरांनी त्याला प्रतिसाद देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपा चार वर्षे सत्तेत मग्न राहिली. त्यामुळे त्यांचा जनतेशी संपर्कच तुटला. त्यामुळेच आता त्यांनी समर्थनासाठी संपर्क अभियान सुरू केले आहे. भाजपा नेते सेलिब्रेटींना भेटत आहेत तर आमचे नेते राहुल गांधी हे सामान्य माणसाला, दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या संशोधकाच्या कुटुंबाला भेट देत आहेत. आमच्यासाठी सामान्य माणूस हाच सेलिब्रेटी आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
सप्टेंबरपासून महाराष्ट्र दौरा
 प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शिबिरे घेण्यात आली आहेत. पक्षाचे संघटनात्मक काम जोरात सुरू आहे. पावसाळ्याचे दिवस संपले की सप्टेंबरपासून महाराष्ट्र दौरा सुरू केला जाईल व भाजपा विरोधात आवाज बुलंद केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेत यश मिळणार
 गेल्यावेळी आघाडी सरकार विरोधात वातावरण तयार झाले होते. त्यात मोदींच्या भपकेबाज भाषणांची भर पडली. जनता खोट्या आमिषाला बळी पडली. आता जनता जागी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे चित्र एकदम बदललेले दिसेल, असा दावा त्यांनी केला.
मतपत्रिकेने निवडणुका घ्या
 ईव्हीएमच्या वापरावर सुरुवातीपासून शंका घेतली जात आहे. व्हीव्हीपॅट लावल्यानंतरही संभ्रम कायम आहे. उन्हामुळे ईव्हीएम बंद पडल्याचे कारण देण्यात आले. २०१४ ची लोकसभा निवडणूक उन्हाळ्यातच झाली होती. तेव्हा मशीन बंद पडल्या नाहीत. काँग्रेसने ईव्हीएम विरोधात ठराव घेतला आहे. शरद पवारांसह इतर पक्षांनीही जाहीर विरोध दर्शविला आहे. मशीनमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करून पारदर्शकता आणण्यासाठी मतपत्रिकेने निवडणुका घ्याव्या, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

Web Title: Opponents should decide at least the paralal program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.